गुंजी : गुंजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी विजयाचा जल्लोष फटाक्मयांच्या आतषबाजीने केला. काल रात्री उशिरा खानापुरात तिसऱया फेरीमध्ये गुंजी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. त्यामध्ये गुंजी वॉर्ड क्र. दोन मधून सरोजा कृष्णा बुरुड यांनी विजय मिळविला, तर वॉर्ड क्रमांक एक मधून सामान्य जागेसाठी अत्यंत अटीतटीने झालेल्या चौरंगी लढतीत प्रताप नाळकर यांनी केवळ 5 मतांनी विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी पंकज कुटे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. सामान्य महिलांमध्ये तीन उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये लक्ष्मी रमेश घाडी यांनी विजय मिळविला तर ’ब’ गटामध्ये अमोल बेळगावकर यांनी यश मिळविले.
हणमंत जोशिलकर दुसऱयांदा सदस्य
कामतगामध्ये चौरंगी लढतीत हनमंत जोशिलकर दुसऱयांदा निवडून आले तर संगरगाळीतील संघर्षमय निवडणुकीत राजू चोळणेकर व संतोष गुरव हे निवडून आले.
विजयी उमेदवारांचे त्यांच्या वॉर्डात तसेच गावात जल्लोषी स्वागत केले. गुलालाची उधळण आणि फटाक्मयांची आतषबाजी करून उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.









