वंदूर/वार्ताहर
करनूर ता. कागल येथील गिर्यारोहक सागर विजय नलवडे यानी सह्याद्रीसाठी दिलेले योगदान व गिर्यारोहण क्षेत्रात केलेली उत्तम कामगिरी याची दखल घेत त्याना ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील याच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्तींना ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार दिला जातो. गिर्यारोहक विजय सागर नलवडे यानी आजवर सह्याद्री साठी दिलेले योगदान व गिर्यारोहण क्षेत्रात लिंगाणा सोलो आरोहण तसेच युरोप खंडातील रशिया येथील सर्वात उंच हिमशिखर माऊन्ट एलब्रुस व आफ्रिका खंडातील टाझांनिया येथील सर्वांत उंच हिमशिखर माऊन्ट किलीमाजंरो सर करून जागतिक विक्रम करुन कोल्हापुर चे नाव जागतिक पातळीवर मोठे केले आहे. याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील , भुषन गागराणी (प्रधान सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य) व आमदार ऋतुराज पाटिल याच्या हस्ते हाॅटेल सयाजी येथील कार्यक्रमात ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जगातील सात खंडातील सात सर्वोच्च हिमशिखरे सर करणयाचे गिर्यारोहक सागर विजय नलवडे यांचे ध्येय असुन त्यानी आतापर्यंत दोन खंडातील दोन हिमशिखरे सर केली आहेत. त्याचे पुढिल ध्येय जगातील सर्वात उंच शिखर माऊन्ट एव्हरेस्ट सर करण्याचे आहे. त्याच्या माऊन्ट एव्हरेस्ट मोहिमेसाठी भारतीय ध्वज देऊन लागेल ती मदत करण्याचे नामदार सतेज पाटील यानी आश्वासन देऊन मोहिमेस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कोल्हापुर डिस्ट्रिक माऊटेनिअरिगं असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ. अमर अडके, दळवी सर आदि उपस्थित होते.
गिर्यारोहण क्षेत्रात कार्य करत असताना आजवर बरेच सन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. पण आपल्या जन्मभुमी कोल्हापूर येथे आपल्या लोकांसमोर आपल्या लोकानी दिलेली हि सन्मानस्वरुपी पाठिवरील कौतुकाची थाप पुढिल कार्य करण्यास आणखी बळ देईल. -गिर्यारोहक सागर विजय नलवडे –
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









