ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये गिरीश चंद्र मुर्मू यांनी शनिवारी देशाचे नियंत्रक आणि कैगचे महालेखाकार (सीएजी) म्हणून आपला कार्यभार स्विकारला. मुर्मू यांनी पदभार स्विकारल्यानंतर सीएजी कार्यालयात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुर्मू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात सीएजी पदाची शपथ दिली.
दरम्यान, मुर्मू याच आठवड्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल पदावरून आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर मुर्मू यांची राजीव महर्षी यांच्या जागी कैगचे महालेखाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.









