कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतातील कामे आवरून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून चोरांट्यानी कोल्हापूरच्या दिशेने धाव घेतली. हा प्रकार पाहताच गिरगावच्या तरुणांनी या चोरांचा पाठलाग सुरू केला. हा सर्व प्रकार करवीर तालुक्यातील गिरगाव येथे घडला. तरुणांनी चोरांचा पाठलाग करून त्यातील एकाला ताब्यात घेतले. त्यांची रस्त्यातच धुलाई करून एक संशयिताला सोबत घेऊन गेले. तर दोन संशयीत चोरांनी तेथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार आज सायंकाळी आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलवर घडला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शेतातील कामे आवरून महिला घरी जात होती. त्यावेळी बाईक वरून आलेल्या तिघा संशयित चोराट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरल्याची घटना गिरगाव परिसरात घडली. घटना स्थळी पाहणाऱ्या हा सर्व प्रकार पाहणाऱ्या तरुणांनी तिघा संशयित पोरांचा पाठलाग केला. पाठलाग करत करत गिरगावचे तरुणांनी या संशयित चोरट्यांना पार्वती टॉकीज परिसरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल मैदानावर गाठले. निळ्या बाईकवरून पसार झालेल्या चोरट्यांनी तरुणांना पाहताच धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोघां चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. मात्र एक संशयी चोरटा तरुणांच्या हाती लागला. या त्याला मार देत तरुणांनी गिरगावकडे घेऊन गेल्याची माहिती घटनास्थळावरून सांगण्यात आली. ही घटना पाहणार्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्या संपूर्ण प्रकारणाचा तपास काम सुरू आहे.









