क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
दोन वेळा आय-लीग फुटबॉल स्पर्धेतचे जेतेपद आणि गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने गिनिया देशाचा स्ट्रायकर सिकोवू सिल्ला याला करारबद्ध केले आहे. त्याचा हा करार 2021-22 फुटबॉल मोसमासाठी असेल.
चर्चिल ब्रदर्स क्लब व्यवस्थापन सिकोवू सिल्ला याच्या प्रगतीवर मागील दोन वर्षे लक्ष ठेऊन होते. गेल्या मोसमात 29 वर्षीय सिकोवू सिल्ला म्यानमारच्या यांगोन युनायटेड क्लबला खेळत होता. गेल्याच वर्षीय चर्चिल ब्रदर्स त्याला करारबद्ध करणार होते, मात्र तांत्रिक अडचणीमुळे ती डील जमली नाही.
चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करून जेतेपदाकडे आगेकूच केली होती. नंतर मात्र निर्णायक सामन्यांत बचावपटू हाझा खीर, लुका माझसीन, क्लेविन जुनेगा हे पूर्ण तंदुरूस्त नसल्याने चर्चिलचे जेतेपद हुकले होते. यांगोन युनायटेडसाठी खेळलेल्या 58 सामन्यांत 39 गोल केले असून यामधील 12 गोल त्याने एएफसी लढतीत केले आहेत.









