ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र ही राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहे.
महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणि काकासाहेब शिंगारे सभागृह पुणे येथे घेण्यात आली या वेळी प्रदेश पदाधिकारी व 10 जिल्ह्यातून आलेले जिल्हा अध्यक्ष, जिल्हाचिटणीस, आदी उपस्थित होते. यावेळी प्रभू भगवान वीश्वकर्मा प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन बैठकीस सुरुवात झाली.
बैठकीच्या सुरुवातीला शहीद जवान, विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवराना, कोरोना महामारित मृतू मुखी पडलेल्या कामगार बांधवांना श्रधांजली वाहण्यात आली. तसेच मागिल वर्षातील संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
यासोबतच प्रदेश पदाधीकारी यांनी राज्य भर प्रवास करण्याचे ठरले. संघटनेचा राज्यभर विस्तार व वाढीसाठी सर्वानी येकजुटीने ( गाव ) हा केंद्रबिंदू मानुन गावपातळीवर कामगारांची करण्याचा निर्धारही करण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष गणेश भोसले होते. तसेच यावेळी प्रदेश सरचिटणीस शरद पंडीत यांनी बैठकीतील सर्व मुद्द्यावर, सविस्तर विवेचन केले 2021 या वर्षातील तालुका, जिल्हा व प्रदेश स्तरावर करावयाचा कार्यक्रमाची माहिती दिली. तर आप्पा यांनी मार्गदर्शन केल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.
या बैठकीस मीना पंडीत,सचिन जाधव, राजकुमार सुतार, प्रभाकर शिंदे, केशव खरात, स्मिता कोरडे, सुवर्णा कोंढाळकर, विठ्ठल मचे, दत्तात्रय मटाले ,जावेद भाई, ददराव तुपे, उषा जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.








