वारणा कापशी / वार्ताहर
ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला सुगीचे वेध लागतात. ऐन पावसात, थंडी वाऱ्यात, कष्ट करून जोपासलेली खरीप हंगामातील पिके काडणीस आलेली असतात. यामध्ये भात, भुईमुग, सोयाबीन, ज्वारी या पिकांचा समावेश असतो. शाहुवाडी तालुक्यात प्रामुख्याने यामधील भात पिकाचा समावेश आहे. भातपिकाची काडणी करुन धान्याची रास घरी आणण्यात शेतकऱ्याला आनंद मिळत असतो. कारण कुटुंबासाठी वर्षभर लागणाऱ्या अन्नाची गरज भागणार असते.
पुर्वी सगळ्या शेत शिवारात काडणीसाठी माणसांची लगभग दिसायची. आता काळ बदलला, शेती करण्याची माणसिकता कमी झाली. परीणामी शेतीतील मणुष्यबळ कमी झाले. पिकांची पेरणी, मशागत, काडणी व मळणीपर्यंत यंत्राने जागा घेतली. अंग मेहनतीने केली जाणारी सर्व कामे यंत्राने होवु लागली. पैरा पध्दत बंद झाली.
पारंपारीक पध्दतीने भात मळणीची पध्दत दिसेनासी झाली. पुर्वी माळावरच्या मोकळ्या जागेत गोलाकार खळी काडली जायची. मध्यभागी लाकडाचा तिवडा असायचा. दिवसभर काडलेल्या भाताच्या काडाची खळ्याच्या कडेला होळी रचायची. पहाटेच्या मंद चांदण्यांच्या प्रकाशात काडलेल्या भाताची मळणी टाकायची. स्वतःची आणि पैरेकऱ्याची असणारी देशी गाई, म्हैसी, बैल यांची तिवड्याला दावन बांधली जायची. आणी या जनावरांना तिवढया भोवती फिरवुन भाताची मळणी काडली जायची. पहाटेच्या शांत वातावरणात बैलाच्या गळ्यातील चाळाचा, घुंगरांचा आवाज दुरपर्यंत ऐकायला मिळायचा. त्यातच सकाळच्या प्रहरी म्हणजे उजाडताना पक्षांच्या किलबीलाट मिसळायचा. पहाटे टाकलेली मळणी सुर्य उगवेपर्यंत चालायची.
सकाळी खळ्यावरच चहा यायचा. सकाळच्या ऊनात पिंजार पसरायचे, खळ्यावर भात वाळवायचे, भर दुपारी पिंजर हालवायचे म्हणजे पलटी करायचे या कामासाठी चिव्याची काठी असायची तीला आकडी म्हणायचे. दुपारी महिलांनी भाताला वारा द्यायचा व पुरुष लोकांनी वाळलेल्या पिंजराची होळी रचायची. पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या मळणीची तयारी करायची. परंतू मणूष्यबळा ऐवजी भात मळणीसाठी यंत्राची धडधड सुरू झाली. आणी गावगाड्यातील खळ्यावरील मळणी कालबाह्य झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









