वार्ताहर/ मडकई
गावणे बांदिवडे येथील श्री पूर्वाचार्य देवस्थानचा कार्तिक पौर्णिमेला होणारा टोक्याचा जत्रौत्सव सोमवार 30 रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरानाच्या पार्श्वभूमिवर पूर्वाचार्य देवस्थान समितीने पाटणेकर व परवार समाज या संबधीतांची बैठक घेऊन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी धार्मीक विधी, महभिषेक, दुपारी आरत्या व तिर्थप्रसाद होईल. रात्री ब्राह्मण समाधीजवळ दामोदर मुळवी यांच्यावर अवसर येईल. श्रींच्या दर्शनास जाताना भाविकांनी पायऱयांजवळ ठेवण्यात येणाऱया सेनिटायझरचा वापर करावा. दर्शन घेताना गर्दी करू नये. तसेच ओटी दिल्यानंतर चौकखांबाजवळ बसून राहू नये असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना भक्त व भाविकांनी गर्दीवर टाळावी. रात्री पाटणेकर समाजास अवसर व्यक्तीकडून गंधाचा टिळा लावला जाणार नाही. पाटणेकर समाजातील प्रत्येक सदस्याने वाटीतील गंध स्वत:च घेऊन आपल्या कपाळास टिळा लावाला. टोक्याचा जत्रोत्सव साजरा करताना श्री पूर्वाचार्य देवाचा अवसर प्रथेनुसार तीन सन्माननीयांची कौले देईल व केवळ त्यांच्याच कपाळाला विभूती लावली जाईल. त्यानंतर फक्त मानाची कौले घेण्याऱयांनीच कौले घ्यावीत. ही कौले घेतना ती विभुतीच्या ताटात न ठेवता स्वत: आणलेल्या परातीत ठेवून कौल घ्यावा. सर्व सिमांचे दाळप केले जाईल. मात्र त्यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेऊन सामाजिक अंतर पाळून सक्तीने मास्क वापरावे लागेल.
सिमांना भेटी देण्याच्या काळात भक्त व भाविकांकडून आरती होणार नाही. एकारती ते धुपारती या सर्व आरत्या एकाच परातीत ठेवून एकदाच ओवाळणी करावी. चरणांवर पाणी व कपाळास गंध लावण्यास प्रतिबंध आहे. कुटूंबातील ज्येष्ठ सदस्याने कौल घेताना अनावश्यक गर्दी करू नये. श्री कऱहाडे, ग्रामपूरूष, श्री रवळनाथ, श्री बेताळ व श्री नागेश देवास भेटीस जाताना वाटेत लागणाऱया फक्त मानकऱयांनीच मानाची कौले घ्यावीत. शेवटचे कौल श्री नागेश संस्थान समितीच्या एकच पदाधीकाऱयाला देताना केवळ त्याच्याच कपाळास विभूती लावली जाईल. अवसर विर्सजनावेळी टोका व अवसराला घेऊन श्री नागेश देवाच्या गर्भागृहात जाताना टोक्याला धरणाऱयांव्यतिरिक्त अन्य कुणीही भाविक व भक्तांना टोक्याल स्पर्श करण्यास मनाई असेल.
नागेश देवस्थानचा जत्रोत्सव मर्यादित स्वरुपात
श्री नागेश देवाचा जत्रोत्सव अंत्यत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. बुधवार 25 नोव्हेंबर ते गुरूवार 3 डिसेंबर पर्यंत हा जत्रौत्सव होणार आहे. श्री नागेश श्री महालक्ष्मी जोड शिबिकोत्सवावेळी सायंकाळी वनभोजन, शिबिकोत्सवावेळी वाटेत आरत्या फुले फळे स्विकारली जाणार नाहीत. श्री नागशे महालक्ष्मी जोड पालखीवेळी वाटेत फक्त रवळनाथ देवस्थान व राजे सौंधेकर कुटुंबियांकडून आरत्या स्वीकारल्या जातील. देवी श्री महालक्ष्मीची ओटी ही फक्त देवस्थानतर्फे भरण्यात येईल. यावर्षी दिवजोत्सव, गांठवल, जायवळ हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.









