अधिकाऱयांच्या बैठकीत तहसीलदारांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील गावठी दारू अड्डय़ांवर अबकारी, पोलीस, महसूल, वनखाते आदी खात्यांच्या अधिकाऱयांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची सूचना तहसीलदारांनी केली आहे. एकत्रितपणे कारवाई केली तरच गावठी दारू थोपविता येणार आहे.
तहसीलदार कार्यालयात तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अबकारी उपअधीक्षक सी. एस. पाटील, निरीक्षक लिंगराज के., मंजुनाथ मळ्ळीगेरी, महेश परीट, समाज कल्याण खात्याचे भीमगोळ, काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश व्ही. वाय., मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. पाटील व वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव तालुक्मयातील हुल्यानूर, बुड्रय़ानूर, मुत्यानट्टी, गँगवाडी, बडस व वाल्मिकीनगर परिसरात गावठी दारू अड्डे सुरू आहेत. वारंवार या अड्डय़ांवर कारवाई केली जाते. पूर्णपणे गावठी दारू थोपविण्यासाठी गस्त वाढविण्याबरोबरच या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अबकारी विभागावर यासंबंधी जास्तीची जबाबदारी आहे, असे तहसीलदारांनी सांगितले.
आर. बी. होसळ्ळी यांनी स्वागत केले. खासकरून गावठी दारू अड्डे जंगल परिसरात सुरू आहेत. यासंबंधीची माहिती मिळवून अधिकाऱयांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची गरज आहे. कारवाई करण्याबरोबरच गावठी दारूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.









