प्रतिनिधी / गारगोटी
गारगोटी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार महादेव लक्ष्मण आबीटकर( वय 55) यांचा ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.आज सकाळी ड्युटीवर हजर झाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
सैन्यदलातील निवृत्तीनंतर पोलीस दलात त्यांची भरती झाली होती ,सकाळी पोलीस नेहमीप्रमाणे दाखल झाल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा मित्र परिवार आहे क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून त्यांचे पार्थिव ची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस दलातील कर्मचारी त्याचबरोबर गारगोटी गाव भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हुतात्मा मार्ग समोर गारगोटी चे सरपंच संदेश भोपळे पोलीस निरीक्षक उदय डुबल श्रीकांत कंकाळ आदींनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. गारगोटी वैंकूठ धाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकप्रिय व्यक्तिमत्व
पोलीस हवालदार आबीटकर आपल्या शांत व सहकारी स्वभावामुळे पोलीस ठाण्यात सर्वाना प्रिय होते त्यांचे पार्थिव पोलीस ठाण्यासमोर येताच सहकारी तसेच महिला कर्मचार्यांनी धाय मोकळून रडत होते.









