प्रतिनिधी / गारगोटी
भारतीय जनता पार्टी भुदरगडच्यावतीने गारगोटीमध्ये राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार व महावितरण कंपनीच्या विरोधात वीज कनेक्शन तोडणीची कारवाई त्वरित थांबावी व कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल माफ व्हावे म्हणून गारगोटी कोल्हापूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्य रस्त्यावर तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली.
तालुक्यात अचानक ग्राहकांची वीज बिलांची वसुली चालू केली असून ज्यांची बिल थकीत आहेत. त्यांची कनेक्शन तोडणेची कारवाही चालू केली त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने हे आंदोलन केले,कोरोनाच्या काळात मीटर रीडिंग घेतले नसताना सुद्धा हजारो रुपयांची वीज बिले बेकायदेशीर रित्या आली. ही बिले अन्यायकारक असून जनतेची ही लूट असून ती थांबवली पाहिजेत असा इशारा भा, ज, पा, जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई यांनी दिला,ही महावितरणची कार्य वाही त्वरित थांबली नाही तर याच्या ही पुढे ही तीव्र आंदोलन केले जाईल असे आव्हान केले.
त्या नंतर महावितरणचे अधिकारी आंदोलन स्थळी येऊन ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे आश्वासन त्या ठिकाणी दिले महावितरण चे उपअभियंता पवार यांनी दिले.