मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका वैशाली माडे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तिने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. वैशालीच्या प्रवेशानंतर मंत्री धनंजय मुंडेंनीही ट्विट करुन तिचं स्वागत केलं आहे. तसेच वैशाली माडेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार तिची
राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते. मात्र, कोरोनाचं संकट वाढल्यामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर, आज वैशालीने अधिकृतपणे राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्विकारले आहे. यावेळी, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








