प्रतिनिधी/ म्हापसा
राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त केलेले गोमंतकातील एक सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत वेर्णेकर यांच्या नाटय़गीत व भावगीतांच्या ध्वनिमुदीकाचे प्रकाशन आज 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी कळंगूट येथे होणार आहे.
गोमंतकातील सुप्रसिद्ध हार्मेनियम वादक राया कोरगावकर यांच्याहस्ते या ध्वनिमुदीकाचे प्रकाशन होणार आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारला हाणार असलेल्या या कार्यक्रमाला कोविडच्या परिस्थितीमुळे मर्यादीत प्रमाणात प्रेक्षकवर्ग उपस्थित असेल असे आयोजकांनी कळविले आहे.









