प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील गाडेगांव येथे राजरोजपणे गावातील सिंगल फेज कनेक्शनच्या तारेवर विना कनेक्शन आकडे टाकून वीजेची चोरी केली जात आहे. त्या वीज कनेक्शनचा वापर शेतातील मोटारी, सबमर्सिबल पंप वापरण्यास होत आहे. याचा परिणाम सिंगल फेज डेपोवरील फेज वारंवार खराब होऊन गावातील वीज वारंवार खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा त्रास वेळेवर वीज भरणार्या अनेक वीज ग्राहकांना होत आहे. वारंवार वीज खंडीत होत असल्याने अनेकांच्या घरातील वीजेची उपकरणे खराब होत आहेत.
या सर्व प्रकारावर संबंधित वायरमन यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष करून अर्थकारण साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या बाबतची तक्रार वायरमन यांच्याकडे केल्यास ‘चालंलय तर चालु द्या की’ अशा भाषेत उत्तर मिळत असल्याचे गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबतची तक्रार गावातील मा. शिवसेना अध्यक्ष, अमृत पाटील यांनी महावितरणकडे केली आहे.
संबंधित प्रकारामुळे महावितरणचे नाव विनाकारण बदनाम होत आहे. तरी संबंधित अधिकार्यांनी सदरील प्रकारामध्ये त्वरीत लक्ष घालून विना कनेक्शन आकडे टाकून वीजेची चोरी करणार्या व या प्रकारावर दुर्लक्ष करणार्या कर्मचार्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील वीज ग्राहकांकडून केली जात आहे.
Previous Articleश्रीकांत दातार यांचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले…
Next Article गोबर गॅसच्या टाकीत गुदमरुन युवकाचा मृत्यू









