सर्व महिलांमध्ये श्रवणशक्ती नाही
गाझा येथील 8 महिलांच्या एका समुहाने शॉर्ट ऍनिमेशन फिल्म्स तयार केल्या आहेत. या महिलांमध्ये श्रवणशक्ती नाही. या महिलांनी स्वतःच्या मुलांची स्थिती व्यक्त करण्यासाठी ऍनिमेशनची मदत घेतली आहे.
आपल्या मुलांच्या खराब स्थितीविषयी अन्य मुलांनाही कळावे अशी त्यांची इच्छा आहे. ऍनिमेशनसह कारकीर्दीत अन्य पर्यायही उपलब्ध होते. पण ऍनिमेशनद्वारे चांगले उत्पन्न मिळण्यासह आपल्याविषयी लोकांना जाणून घेण्याची संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. आतापर्यंत त्यांनी दोन शॉर्ट ऍनिमेशन फिल्म्स तयार केल्या आहेत.
त्यांनी तयार केलेला एक चित्रपट साइन लँग्वेजवर आधारित आहे. तर दुसरा चित्रपट गाजामधील त्यांचे अधिकार दर्शवितो, जेथे बेरोजगारीचे प्रमाण 49 टक्के इतके आहे. त्यांच्या या कथेतून ऐकू येत नसल्याने त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत, जे दूर करून यशस्वी होण्याचे प्रावीण्य त्यांच्याकडे असल्याचे दिसून येते. या महिलांनी ऍनिमेशन चित्रपट तयार करण्यासाठी सोप्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
ऍनिमेशनपट तयार करणाऱया एका महिलेचे वय 27 वर्षे असून तिचे नाव हिबा अबू जजर आहे. तिला लहानपणापासूनच कार्टून आवडायचे. हिबाने स्वतःच्या साइन लँग्वेजद्वारे ऍनिमेशनपट तयार करणे आणि ते इतरांना शिकविणे चांगले वाटत असल्याचे आणि या कौशल्याद्वारे नोकरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले आहे.









