उचगाव / वार्ताहर
मोबाईल देण्या घेण्यावरुन मित्रामित्रामध्ये झालेल्या भांडणात तिघांजणांनी धारदार शस्त्राने भोकसल्याने किसन शाहु बाबर (वय २४,रा. म्हसोबा माळ गांधीनगर) हा युवक जखमी झाला. गांधीनगर रेल्वेस्टेशनजवळ हा प्रकार झाला.
किसन बाबर आणि करण कंदमुळे आणि त्याचे मित्र अभी व शाहू ( तिघेही रा. बागडी वसाहत गडमुडशिंगी ) यांच्यात रविवारी मोबाईल देण्यावरून भांडण झाले. करण कंदमुळे आणि त्याच्या अन्य साथीदारांनी धारदार शस्त्राने किसनच्या पोटावर वार केले. त्यात तो जखमी झाला.
या घटनेची माहीती समजताच गांधीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी किसन बाबर याच्यावर गांधीनगर वसाहत रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.









