बेळगाव : अधिकृत नोंदणी न करताच दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱया गांधीनगर येथील डॉ. ए. बी. सय्यद यांच्या दवाखाना आणि क्लिनिकला औषध नियंत्रक विभागाने टाळे ठोकले.
औषध नियंत्रक विभागाने डॉ. सय्यद यांच्या क्लिनिकची तपासणी करताच त्यांच्याकडे केपीएमईए म्हणजेच कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लीशमेंट ऍक्टनुसार अधिकृत नोंदणी परवानापत्र नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अधिकाऱयांनी त्यांच्या दवाखाना आणि क्लिनिकला टाळे ठोकले. केपीएमईएचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. एम. बी. किवडसण्णर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, निरीक्षण अधिकारी मंजुनाथ बिसनळ्ळी, ब्लॉक प्रोग्रॅम मॅनेजर शंकर देसाई आणि त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.









