उचगाव / वार्ताहर
गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यात गांधीनगर पोलिसांना यश आले आहे.गांधीनगर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी व अवैध धंद्यावर चांगलाच वचक बसविला आहे.बर्याच दिवसानंतर सिंघम अधिकारी गांधीनगर पोलिस ठाण्याला मिळाला असुन दोन नंबरवाले गुन्हेगार मात्र धास्तावले आहेत.गांधीनगरची वाहतूकही सुरळित करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गावठी दारु,मटका,तीन पत्ती जुगार,मारामारी यासह अनेक अवैध धंद्यावर सपोनि सत्यराज घुले यांनी जोरदार प्रहार करीत हे धंदे बंद पाडले आहेत.फाळकूट दादांच्यावर सिंघम पद्धतीने कारवाई होत असल्याने दादाही वचकून आहेत.गांधीनगर परिसर अवैध धंद्याचे केंद्र बनले होते.मात्र पोलिसांनी क्रमाक्रमाने कारवाई करीत धंदे बंद पाडले आहेत.
गांधीनगर वाहतूकीची समस्या मोठी असुन दिवाळीपासून वाहतूक सुरळित पार पाडण्यासाठी परिश्रम घेवून वाहतूक सुरळीत करण्यातही पोलिसांनी प्रयत्न केले आहेत.गांधीनगर, उचगाव, गडमुडशिंगी या मोठ्या गावात ‘तिसरा डोळा’ सीसीटिव्ही कॅमेरा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी तीस लाख रुपये लागणार असुन लोकसहभागातून व शासनाकडून मदत घेवून लवकरच सीसीटिव्ही सुरु करण्यासाठी सपोनि सत्यराज घुले यांनी पुढाकार घेतला आहे.
चोऱ्या रोखण्यात मात्र अपयश
उचगाव व गांधीनगर परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्यात मात्र गांधीनगर पोलिसांना अपयश आले असुन ज्याप्रमाणे अवैध धंदे बंद करण्यात पोलिसांनी प्रयत्न केले आहेत त्याप्रमाणे चोऱ्यांवर चाप लावावा अशी मागणीही जनतेतून होत आहे.