प्रतिनिधी / उचगांव
गांधीनगर (ता. करवीर) परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले. शुक्रवारी गांधीनगर (46), वळिवडे (40), उचगाव (10), चिंचवाड (4) आणि गडमुडशिंगी (3) गावातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 103 झाली आहे .
गांधीनगर (ता. करवीर) परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत शंभरी पार केली. गांधीनगर, वळिवडे, उचगाव, गडमुडशिंगी आणि चिंचवाड या गावांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 103 झाली. गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
मागील सोमवारपासून गांधीनगर परिसर कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वळिवडे येथील गावभागात कोरोनाचा शिरकाव गांभिर्य वाढविणारा आहे. वळिवडे रस्त्यावरील एका परिसरातील सातजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच येथील मेडिकल व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच येथील एका शेतकऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका दूध विक्रेत्याला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या घरातील दोघांनाही संसर्ग झाल्याचे आज आढळून आले.
त्यामुळे वळिवडे गावातील कोरोनाचा संसर्ग गावकऱ्यांना विचार करावयास लावणारा आहे. उचगावमधील एका ट्रकचालकाला तसेच एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. गांधीनगरमधील आठ जणांचा कोरोना आहवाल पॉझिटिव्ह आला. तर गडमुडशिंगी हद्दीतील अपार्टमेंटमधील एक तरुण व्यापारी आणि शाहूनगर वायदंडे वसाहतीतील एका तरुणीस कोरोनाची लागण झाल्याचे आज समजले. चिंचवाडमधील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर झाल्याने तेवढीच समाधानाची बाब आहे. गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची संख्या याप्रमाणे – गांधीनगर (46), वळिवडे (40), उचगाव (8), चिंचवाड (4) आणि गडमुडशिंगी (3). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 103 झाली आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ात दिवसभरात २४५ पॉझिटिव्ह रूग्ण,इचलकरंजीत 2 बळी
Next Article बेळगाव जिह्यात कोरोना बळींची मालिका सुरुच








