वार्ताहर / उचगांव
गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी नऊने वाढली असून ती 246 वर पोहोचली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांमुळे गांधीनगर परिसर चिंताग्रस्त बनला आहे.
गांधीनगरमध्ये सोमवारी सहा रुग्णांची वाढ झाली. वळीवडे येथील रुग्णसंख्या दोनने वाढली आहे. उचगावमध्ये एक रुग्ण आढळून आला. गांधीनगर परिसरात संसर्गाची साखळी वेगाने वाढत आहे. गांधिनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगी व चिंचवाडमधील रुग्णसंख्या मात्र स्थिर राहिली आहे.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची सोमवार अखेरची संख्या अशी – गांधीनगर (106), वळिवडे (61), उचगाव (47), गडमुडशिंगी (18), चिंचवाड (14). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 246 वर पोहोचली आहे. आजअखेर मृतांची संख्या पाच आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








