वार्ताहर / उचगांव
करवीर तालुक्यातील गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून ती शनिवार अखेर 227 वर पोहोचली आहे. कोरोना महामारीचा संसर्ग वाढतच राहिल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
वळीवडे येथे शनिवारी चार रुग्ण वाढले. उचगावमध्ये संसर्गाची साखळी वेगाने वाढत असून रुग्णसंख्याही वाढली आहे. गांधीनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगी हद्दीमधीलमध्ये 5 रुग्ण मिळून आले आहेत. चिंचवाडमधील रुग्णसंख्या एकने वाढली आहे.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची शनिवार अखेरची संख्या अशी – गांधीनगर (98), वळिवडे (59), उचगाव (44), गडमुडशिंगी (17), चिंचवाड (9). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 227 वर पोहोचली आहे. आजअखेर मृतांची संख्या पाच आहे.
Previous Articleमिरजेत नवे 14 रुग्ण, राजकीय नेत्यासह दोघांचा मृत्यू
Next Article मिरजेत नवे 14 रुग्ण, राजकीय नेत्यासह दोघांचा मृत्यू








