दैनिक तरुण भारतच्या बातमीचा परिणाम
उचगाव / वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथे टपरी टपरीवर मिळणारा गुटखा गेले चार दिवस मिळेनासा झाला आहे.पोलिस ठाण्याजवळ वावरणारे पंटर गायब झाले आहेत. दैनिक तरुण भारत ने गांधीनगर गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र बनले आहे या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.
त्यानंतर मोठ्या प्रमाणात दररोज लाखोंची उलाढाल होणारा गुटखा टपऱ्या वरून गायब झाला. बातमीचा परिणाम होऊन गेले चार दिवस टपऱ्यांवरून राजरोसपणे विकला जाणारा गुटखा मिळेनासा झाला आहे. पोलिसांचे पंटर भासवून फिरणाऱ्या तोतया व्यक्ती गायब झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीमुळे गुटख्याचे गोडाऊन अन्यत्र हलविण्यात आलेले आहेत. त्यामुळे परिसरातून दैनिक तरुण भारतचे कौतुक होत आहे.









