प्रतिनिधी / उचगांव
गांधीनगर ( ता. करवीर ) परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असून रविवार अखेर रुग्णसंख्या 143 वर पोहोचली आहे. गांधीनगर, वळिवडे येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान गांधिनगर मेनरोडवरील वळीवडेसह पाच गावांच्या सीमा यापूर्वीच सील केल्या आहेत.
रविवारी गांधीनगरमध्ये एका तर वळीवडे येथे सहा रुग्णांची भर पडली. वळीवडे येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामपंचायत प्रशासन औषध फवारणीसह प्रतिबंधक उपाय योजना करत आहे. उचगाव व गांधीनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगी हद्दीत रविवारी प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. चिंचवाडमधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आणखी एका महिला रुग्णाची भर पडली आहे.
तिच्या सहवासातील चार जणांना तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवल्याचे सरपंच सुदर्शन उपाध्ये यांनी सांगितले. उचगांव येथे नव्याने रविवारी सहा रुग्णांची भर पडली. गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची रविवारअखेरची संख्या अशी – गांधीनगर (60), वळिवडे (50), उचगाव (22), चिंचवाड (5) आणि गडमुडशिंगी (6). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 143 झाली आहे.
Previous Articleसांगली : कंटेन्मेंट झोनचे उल्लंघन, नेवरीत दोघांवर गुन्हे दाखल
Next Article सलग दुसऱया दिवशीही दोनशेचा आकडा पार








