प्रतिनिधी / उचगांव
गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी रुग्ण संख्येने द्विशतक पार केले असून आकडा 210 झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी गांधीनगरमधील 62 वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गांधीनगर परिसरातील आजअखेर मृतांची संख्या 5 वर पोहोचली आहे. गांधीनगर परिसरातील कोरोना महामारीचा संसर्ग वाढतच राहिल्याने भीतीचे सावट गडद झाले आहेत.
गांधीनगरमध्ये शुक्रवारी एका रुग्णाची वाढ झाली. वळीवडे येथे दोन रुग्ण वाढले. उचगावमध्ये संसर्गाची साखळी वाढत असून रुग्णसंख्या वाढत आहे. उचगावपैकी निगडेवाडी येथील एका वकिलासह त्याच्या कुटुंबातील चौघा जणांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. मोळे कॉलनीमध्ये व गणेश कॉलनीमध्ये एक रुग्ण आढळला. आज प्रथमच गडमुडशिंगीमधील समर्थनगरमध्ये एक रुग्ण मिळून आला. चिंचवाडमधील रुग्णसंख्या मात्र स्थिर आहे.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची शुक्र गाणी वारअखेरची संख्या अशी – गांधीनगर (98), वळिवडे (55), उचगाव (37), गडमुडशिंगी (12), चिंचवाड (8). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 210 वर पोहोचली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








