उचगाव /वार्ताहर –
करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत कोविड – १९ च्या अनुषंगाने विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आत्तापर्यंत तीन लाख चार हजार सातशे रुपये दंड व ५९ वाहने जप्त करण्यात आली.
याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी माहीती दिली. वाढत्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी व जमावबंदी आहे. विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्या गाड्या तसेच ठरलेल्या वेळेत बंद न करता चालू असलेली दुकाने, हॉटेल व इतर आस्थापना यांच्यावर पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने दंडात्मक कारवाई करत तीन लाखाच्यावर दंड वसूल केला.
विना मास्क व सोशल डिस्टन्स
८३७ केसेस:- ८३७००/- रु. दंड
ट्रॅफिक (M V act) –
८१५ केसेस १६३०००/- रु. दंड.
दाखल १८८ प्रमाणे -०५
वाहन जप्त=५९
आस्थापना- ६७ केसेस दंड-५८०००
याप्रकारे दंड वसुल केल्यामुळे परिसरात मास्क,सोशल डिस्टन्स तसेच विनाकारण मोटारसायकली फिरविण्याचे प्रमाण कमी येवून कोरोनाला आळा घालण्यात काही अंशी शक्य झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









