उचगांव / वार्ताहर
बेकायदेशीररित्या ठेव जमा करून ती दहा टक्के व्याजाने भिशीतील सभासदांना वाटप करणाऱ्या गांधीनगर बाजारपेठेतील गडमुडशिंगी हद्दीतील गुडलक स्टोअर्सचा मालक प्रकाश रमेश वाधवाणी (वय 39, रा. वृषाली हॉटेल शेजारी, सोना पार्क, कोल्हापूर) याला छापा टाकून अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख 80 हजार 930 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. हा छापा करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने टाकण्यात आला.
बुधवारी (दि. 23) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास गांधीनगर बाजारपेठेतील गडमुडशिंगी हद्दीमधील प्रकाश रमेश वाधवाणी याच्या गुडलक स्टोअर्स या दुकानावर करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामधील पोलीस उपनिरीक्षक सुनील विलास माळगे यांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत छापा सत्र सुरू राहिले. त्यात सांकेतिक पद्धतीने लिहिलेल्या हिशेब नोंदवह्या, करार पत्रे, मिळकतीचे उतारे, दस्तऐवज, धनादेश व 4 लाख 80 हजार 930 रुपयांची रक्कम मिळून आली. रोख रकमेसह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला व प्रकाश वाधवानी याला अटक करण्यात आली. गुरुवारी (दि.२४) त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









