मृत टिप्पर चालक कित्तूर तालुक्यातील
प्रतिनिधी / बेळगाव
एका टिप्पर चालकाचा हृदयाघाताने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी गांधीनगरजवळ ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सुरेश बसाप्पा मेळवंकी (वय 31, रा. तुरमुरी, ता. कित्तूर) असे त्याचे नाव आहे. टिप्पर चालवत असतानाच छातीत वेदना जावणत असल्याने त्याने आपल्या मालकाला व कुटुंबीयांशी संपर्क साधून ही गोष्ट कळविली. त्यानंतर जवळच्या दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले.
मात्र, सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून
3 वाजता सिव्हिलला हलविताना त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.









