प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करून प्रवाशांच्या सोयीसाठी गांधीधाम – तिरुनेलवेली साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत ही स्पेशल गाडी सुधारित वेळेनुसार धावणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने चालवण्यात येणारी ही गाडी पूर्णपणे आरक्षित आहे. ही गाडी गांधीधाम येथून दर सोमवारी पहाटे ४.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.३५ वाजता तिरुनेलवेलीला पोहचेल. परतीच्या प्रवासात तिरुनेलवेली येथून दर गुरुवारी सकाळी ७.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री २.३५ वाजता गांधीधामला पोहचेल. २१ डब्यांची ही गाडी वसईमार्गे धावणार असून कोकण मार्गावर पनवेल व रत्नागिरी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









