ऑनलाईन टीम / बंगळूर :
कर्नाटकातील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी थेट महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘गांधींजींचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
बंगळूर येथील एका कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. स्वातंत्र्याची ही खरीखुरी लढाई नव्हती, तर परस्पर संमतीने घडवून आणण्यात आलेला हा लढा होता. या चळवळीतील नेते म्हणवणाऱयां एकदाही पोलिसांची लाठी खावी लागली नाही. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठं नाटकं होतं.
तसेच अशा लोकांना भारतात महात्मा म्हणून कसं काय संबोधलं जातं, असा सवालही हेगडे यांनी केला आहे. यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे.









