वाई पोलिसांची कारवाई; दहा हजार रुपयांचा गांजा हस्तगत
प्रतिनिधी/वाई
येथील रविवार पेठेत घरातच गांजा विकत असलेल्या महिलेला वाई पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने छापा टाकून रंगे हात पकडले. तिच्याकडुन 1 किलो वजनाचा 11हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला असून वाई पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केली असता वाई न्यायालयाने तिला दि.29पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शहनाज सिज्जाउद्दीन मुजावर(वय 52, रा.रविवार पेठ वाई)असे त्या महिलेचे नाव आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना खास खबऱ्याकडुन माहिती मिळाली की वाई शहरात एक महिला गांजा विक्री करते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला ही माहिती मिळाली होती. सोमवार, दि.25रोजी सापळा लावून रविवार पेठेत छापा टाकला असता शहनाज मुजावर ही महिला गांजा विकत असल्याचे आढळून आले. तिच्या घरात 1 किलो 160 ग्रॅम 11 हजार30 रुपयांचा गांजा आढळून आला. तिला अटक करून दि.26रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.29पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याचा तपास स.पो.नि. रवींद्र तेलतुंबडे करत आहेत. ही कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पो.कॉ.सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, महिला पोलीस दीपाली निकम, सोनाली माने यांनी सहभाग घेतला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









