अबकारी विभागाची कारवाई, दोन किलो गांजा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
महांतेशनगर परिसरात गांजा विकणाऱया एका तरुणाला अटक करुन त्याच्या जवळून 2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अबकारी विभागाच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी ही कारवाई केली आहे.
अनकुलचंद्र महेंद्र कन्हार (वय 22, रा. तिलपंगी, पोस्ट कटडी, तिकाबाली, जि. कंदमाल, ओडीशा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अबकारी निरीक्षक रविंद्र होसळ्ळी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महांतेशनगर परिसरात महामार्गाजवळ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच अबकारी विभागाच्या सहआयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार अचानक छापा टाकुन अनकुलचंद्रला अटक करण्यात आली. त्याच्यावर एफआयआर दाखल करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.









