ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्जच्या यादीतून हटवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर घेण्यात आलेल्या मतदानात भारतासह 27 देशांनी गांजाला ड्रग्जच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले.
गांजाला धोकादायक ड्रग्जच्या यादीतून हटवल्यामुळे गांजाची औषधाच्या दृष्टीने पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. तसेच भविष्यात गांजाचा औषधांसाठी वापर वाढू शकतो. अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.
गांजाचे वैद्यकीय महत्व समजून 50 देशांनी गांजाला ड्रग्जच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केले. तर पाकिस्तान, चीनसह 25 देशांनी याला विरोध केला.