ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील यांच्यासह पाचजन विरोधी आघाडीत, राजर्षी शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनलची घोषणा
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेच्या सत्ताधारी गटात फूट पडली आहे. ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यामान पाच संचालकांनी सत्ताधारी विरोधी संचालक बाळासाहेब घुणकीकर यांच्यासबोत हातमिळवणी केली असून राजर्षी शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनलची घोषणा गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यस्तरीय 13 संघटनांचा पॅनलला पाठिंबा असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
प्रकाश पाटील म्हणाले, मी गेली 32 वर्षे बँकेत संचालक म्हणून कार्यरत आहे. सत्ताधारी गटातून विजयी झाले असलो तरी निवडणुकीनंतर काही महिन्यातच कारभाऱयांनी रंग दाखवण्यास सुरवात केली. अनावश्यक शाखा सुरु करुन बँकेला खर्चाच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक बोजा बॅंकेवर पडला आहे. चुकीच्या कारभाराला सातत्याने विरोध केल्याने महत्वाच्या कामकाजात डावण्यात येत होते. ठरावीक लोकांची मर्जी सांभाळण्यासाठी सत्तधारी काम करत आहेत. असा अरोप पाटील यांनी केला. निवृत्तीचे वय 58 वरुन 55 करण्यास विरोध केला तरीकही कर्मचाऱयांचे जबरदस्तीने राजीनामे घेतले. आता 32 कर्मचारी न्यायालयात केले असून बँकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने बँकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. अशा प्रकारच्या मनमानी कारभाला कंटाळून आघाडीतून बहेर पडल्याचे पाटील यांनी सांगितले.
बाळासाहेब घुणकीर यांनी चुकीच्या दिशेने कारभार सुरु आहे. वेळोवेळी चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने काही प्रमाणात पायबंध बसल्याचे सांगितले. सत्ताधाऱयांच्या चुकीच्या कारभाराला सभासद वैतागले असून निवडणुकीत परिर्वतन अटळ आहे. परिवर्तन पॅनलला सातही जिल्हय़ातून वाढता पाठिंबा असल्याचही घुणकीकर यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र पाटील, जयदीप कांबळे, संजय सुतार, पी. जी. मांढरे, नेहा कापरे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.









