वार्ताहर/ रेवोडा
गव्या रेडय़ाच्या हैदोसाने हैराण झालेल्या नादोडा येथील शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी थिवीचे आमदार निळकंठ हळर्णककर वन विभागाचे रेंज फॉरस्ट अधिकारी गिरीश बैलुस्कर, हरीष महाले, अनिल केरकर, क्रिष्णा गावस यांनी नादोडा येथे जाऊन येथील शेतकऱयांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली व गव्या रेडय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल हे जाणून घेतले.
गेली दोन तीन वर्षे शेतकऱयांनी मेहनत करून उगवलेली शेती, बागायत, हळसांदे, गावठी मिरची, कांदे, केळी आदी पिकांची नासधूस करून टाकतात त्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱयांनी गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकवेळा सरकारकडे केली परंतु त्यावर काहीच उपाययोजना करण्यात आली नाही तसेच झालेली नुकसान भरपी म्हणूनही शेतकऱयांना शेतकी खात्याकडून किंवा सरकारकडून कोणताच मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेती करून गव्याकडून नुकसानी होत असल्याने नाराज झालेल्या शेतकऱयांनी यंदाच्या वर्षी पीकच घेतले नाही. यावेळी शेतकऱयांनी आमदार हळर्णकर व वन खात्याचे अधिकाऱयांबरोबर चर्चा करताना काटेरी कुंपण किंवा संरक्षण भिंत उभारावी व कायमस्वरुपी उपाय योजना करावी अशी मागणी केली.
नुकसान भरपाई नाही
नादोडा येथील शेत मळय़ात दीड- दोनशे शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात त्यात भात शेती केळी, हळसांदे, गावठी मिरची, गावठी कांदे, कुळीत, आदी पिके घेतली जातात. गेल्यावर्षी तिळारी धरणाचे अचानक पाणी सोडल्याने भात पिकाची नुकसानी झाली होती व त्यामुळे सगळी मेहनत वाया गेली होती त्यावर मात करून शेतकऱयांनी पुन्हा मेहनत करून पिकांची लागवड केली मात्र गव्यांकडून वारंवार पिकाची नासधूस करण्यात येत आहे. आमदार निळकंठ हळर्णकर यावेळी शेतकऱयांना गव्याचा बंदोबस्त व ठोस उपाययोजना करण्यासाठी आपले सहकार्य असल्याचे सांगितले. वन अधिकाऱयांची शेतकऱयांबरोबर रानात फिरून गव्यांच्या येणाऱया वाटांची पाहणी केली असता शेतकऱयांनी यावेळी गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली.
0306map2(Anandi mail
नादोडाः शेतकऱयांची गव्याकडून होणाऱया नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्याचे म्हणणे ऐकताना आमदार निळकंठ हळर्णकर व वन खात्याचे अधिकारी गिरीश बैलुरकर, हरीष महाले, अनिले केरकर, क्रिष्णा गवस व शेतकरी.








