प्रतिनिधी / कोल्हापूर
शुक्रवारी रात्री शहरातील सुतार मळा परिसरात रात्री गव्याच्या कळपाचे आगमन झाले, शनिवारी दुपारी हा कळप बांलिग्याकडे गेल्याची माहिती होती, पण रात्री उशिरा हे गवे पुन्हा शहरानजिकच्या शेतात दिसून आले. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गवा रंकाळा तलावानजीक डी मार्ट शेजारील शेतात दिसून आला. त्याला पाहण्यासाठी गर्दी वाढल्याने तो पुन्हा शेतात गेला. दुपारपासून रात्री उशिरापर्यत चंबुखडीनजिक शेतात गव्यांचा मुक्काम होता. त्याच्यावर वन विभागाच्या 5 टीम लक्ष ठेवून असल्याची माहिती वनाधिकारी विजय पाटील यांनी दिली.
शहरात शुक्रवारी रात्री रानगव्यांचा एक कळप चाऱयाच्या शोधात लक्षतीर्थ वसाहतीतील सुतार मळÎात आला. रात्री 11 वाजता तो उत्तरेश्वर पेठ ते शिंगणापूर पाणंद रस्त्यातून पुढे जाताना दिसला. त्याची माहिती वन विभागाला मिळताच दोन पथके त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. शनिवारी कळपातील 3 गवे शिंगणापूरमार्गे बालिंग्यानजिकच्या शेताकडे गेल्याचे ठसे वन विभागाला मिळाले, गव्यांची विष्ठाही या पथकाला दिसून आली. अधिवासाकडे परत निघालेल्या गव्यांनी शनिवारी रात्री पुन्हा आहे त्याच मार्गाने वाटचाल केली, त्यामुळे रात्री हे गवे शहरानजिकच्या परिसरात दिसून आले.
शहरानजीक रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गवा रंकाळानजिक डीमार्टच्या पलीकडील शेतात दिसून आला. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वन विभागाने त्याला हुसकावल्यानंतर तो शेतात गेला. दुपारी दोनच्या सुमारास सुतार मळा परिसरातील 3 गवे चंबुखडीनजिक माने यांच्या शेतात दिसून आले. रात्री उशिरापर्यत हे गवे तेथेच तळ ठोकून होते.
दरम्यान, गव्यांना हुसकावण्यासाठी दुपारी येथील प्रादेशिक वन कार्यालयात बैठक झाली. बैठकीत गव्यांना अधिवासात पाठवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. गव्यांचा मुक्काम अद्यापी शिंगणापूर परिसरातील चंबुखडी नजीकच्या शेतात आहे. 3 गवे एकत्र आहेत. त्यांच्यावर पाणंदीच्या रस्त्यांवर 2 पथके तर त्यांचा वावर असलेल्या परिसरात वन विभागाची 3 पथके लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
गवे ऊसाच्या शेतातच, शेतकऱ्यांचे वन विभागाला सहकार्य
ऊसाच्या शेतात गवे आहेत, त्यांना हुसकावण्यासाठी फटाक्यांचा वापर करता येणार नाही. तसेच तीनही गवे एकत्र असल्याने त्यांना अधिवासात पाठवणे शक्य आहे. ते जर वेगळे झाले, तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे वन विभागाला अवघड जाणार आहे. त्यामुळे या गव्यांना विचलित करण्यापेक्षा त्यांना हळूहळू जवळच्या वनक्षेत्राकडे नेण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या शेतात गवे आहेत, त्या शेतकऱयांनीही