वाचा घटनाक्रम
ऑनलाईन टीम / कोल्हापूर
बुधवारी कोल्हापूरातील कदमवाडी देवर्डेमळ्यात गव्याचे आगमण
भुयेवाडी परिसरातील गवा वडगाव-वाठार परिसरात फिरून कदमवाडीत
दिवसभर देवर्डेमळ्यातच गव्याचे ठाण
वनअधिकारी,कर्मचारी व प्राणीमित्र बंदोबस्तासाठी तैनात
रात्री साडेअकराच्या सुमारास महाडिक वसाहत परिसरात आणखी एका गव्याच्या बछड्याचे दर्शन
रात्री दोनच्या सुमारास गव्याचे बछडे शहरात घुसले,जिल्हाधिकारी, नागाळा पार्क रोडवर गव्याचा मुक्तसंचार
पहाटे साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,जयंती नाला, सीपीआर चौक, सिद्धार्थ नगर कमान असा गव्याचा प्रवास
पहाटे यु टर्न घेत गव्याचे बछडे सिद्धार्थनगर कडून सीपीआर चौक-जयंती नाला येथून शेतवाडीत
तर रात्री तीनच्या सुमारास जयंती नाला परिसरात आणखी एक गवा दिसल्याची आपत्ती व्यवस्थापनाची माहिती
एकूणच शहर आणि परिसरात तीन गवे असल्याची माहिती आली समोर
देवर्डेमळा येथे असलेल्या भुयेवाडी घटनेतील गवा कुठे गेला ? याची माहिती वनविभागाकडे नाही
तर महाडिक वसाहत येथून आलेले गव्याचे बछडे सध्या पंचगंगा नदी काठावर असल्याची वनविभागाची माहिती
सकाळी दहा वाजता वडणगेत शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन
तर मध्यरात्री तीनच्या सुमारास जयंती नाला परिसरात असलेला गवा कुठे गेला ? याची माहिती देखील वनविभागाकडे नाही