वार्ताहर/मुरगूड
शेतामध्ये पाणी पाजत असताना गवारेडयाने अचानकपणे दिलेल्या धडक एक जण गंभीर जखमी झाला. हिंदुराव ज्ञानदेव चौगुले असे या जखमीचे नाव आहे. चौगुले हे सेवानिवृत्त वनाधिकारी आहेत. आज, रविवारी सकाळच्या सुमारास निढोरी ता. कागल येथे ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी, हिंदुराव चौगुले ‘इनामाचा माळ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या शेतामध्ये पिकाला पाणी पाजण्यासाठी आज सकाळी गेले होते. पाणी पाजून झाल्यानंतर पाण्याची बंद करत असताना पिकामध्ये दबा धरून बसलेल्या गवारेड्याच्या कळपापैकी एका गव्याने चौगुले यांना पाठीमागून धडक दिली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चौगुले हे तोंडावर पडले. यामध्ये त्यांच्या पोटाला जबर इजा झाली. चौगुले यांना वनाधिकारी असल्यामुळे अनुभवाच्या जोरावर त्यानी गव्यापासून स्वतःचा बचाव केला.
हल्ला
परतावून लावत मोठ्याने आरडाओरडा
झाल्यामुळे शेजारील शेतामध्ये
काम करीत असलेल्या युवराज
टोणपे – पाटील व
नितिन दाभोळे हे चौगले यांच्या
मदतीस धावले. तोपर्यंत
गव्याने तिथून काढता पळ काढला.
दरम्यान जखमी अवस्थेत
चौगले यांना उपचारासाठी
तातडीने खासगी रुग्णालयात
दाखल करण्यात आले. दरम्यान
कुरणी -भडगाव वरून
येणारा गव्याचा कळप निढोरी
मार्गे वाघापुऱच्या दिशेने
जात असल्याची चर्चा चालू असून
शेतकरी वर्गामध्ये भितीचे
वातावरण पसरले आहे.