म्हासुर्ली / वार्ताहर
गवशी – भित्तमवाडी (ता.राधानगरी) दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात महापुराने वाहून आलेल्या मोठी लाकडे व इतर पालापाचोळ्याच्या कचऱ्यात गाभण म्हैस अडकून पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने मृत्युमुखी पडली. यात सावतवाडी येथील संभाजी सावंत या संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ४० हजार रुपयाचे नुकसान झाले असून पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यात अडकलेली लाकडे व कचरा साफसफाईकडे दुर्लक्ष केल्यानेच म्हैशीचा गुदमरून मुत्यु झाल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
सावंतवाडी येथील शेतकरी संभाजी सावत सोमवार दुपारी १२ वाजता घरातील जनावरे घेऊन गवशी बंधाऱ्यानजीक त्यांना पाणी पाजण्यास घेऊन गेले होते. दरम्यान जनावरे पाणी पित असताना गाभण म्हैस वेगवान वाहत्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत जावून बंधाऱ्याच्या दरवाजात अडकलेल्या पालापाचोळ्यात व मोठ्या लाकडाच्यात मध्ये आत घुसल्याने तिला बाहेर पडता आले नाही. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे म्हैशीचे डोके लाकडात अडकून पाण्यात गेल्याने तिला बाहेर पडता आले. नाही. परिणामी यात म्हैशीचा गुदमरुन दुदैवी मृत्यु झाला.
यावेळी पोलीस पाटील यांच्या उपस्थित पंचनामा करून म्हैशीच्या मृत शरीराची विल्हेवाट लावण्यात आली. मात्र बंधाऱ्यातील कचरा पाटबंधारे विभागाने वेळीच काढून स्वच्छ केला असता तर आजची दुर्दैवी घटना घडली नसती अशी उपस्थितातून चर्चा होत होती. तरी पाटबंधारे विभागाने बंधारा स्वच्छता करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
Previous Articleलोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह
Next Article सोलापूर शहरात २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू









