प्रतिनिधी/ मेढा
जावली तालुक्यात कोरोनाचा दुसरा राउंड सुरू झाला असून 23 मे रोजी एकाच दिवशी एकूण चार बाधीत रुग्ण सापडल्याने मेढा, केळघर, सायगांव व कसबे बामणोली विभागामध्ये कोरोनामुळे चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
गवडी (मुळ गांव डांगरेघर) ता .जावली येथील पहिला रुग्ण वय वर्ष 18 हा 16 मे ला मुंबईवरून स्वतःच्या बाईकने गांवाला आला होता. त्याला त्रास होवू लागल्याने सातारला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. आणि एकच खळबळ उडाली. मात्र त्याच्या निकटवर्तीयांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असताना या युवकाला त्रास होवू लागल्याने गवडी तून केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या रिक्षाने घेवून जाणाया गवडीतील 32 वर्षीय रिक्षा चालकाला मात्र त्याच्या माणुसकीची शिक्षा मिळाली. पहिल्या रुग्णामुळे विलगीकरण कक्षात असणाऱया या व्यक्तीचा दि 23 रोजी रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. आणि गवडीतील ग्रामस्थांच्या पायाखालची वाळूच सरकली.
या रुग्णाच्या 11 निकटवर्तीयांना पूढील तपासणी साठी वाईला पाठविण्यात आले असून चार व्यक्तींना होमक्यारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान वरोशी, गवडी, सायगांव ,सावरी (बामणोली) ही चार गावे प्रांताधिकायांच्या आदेशाप्रमाणे बंद करण्यात आली आहेत.








