प्रतिनिधी / शिरोळ
महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबरनंतर साखर कारखाने सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी गेल्या आठ दिवसापासून शिरोळ तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे शेतात पाणी असल्यामुळे ऊस तोड कशी करायची तसेच बीड परभणी सोलापूर जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने ऊस तोड मजूर येणार का यासह अन्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिरोळ व हातकणंगले तालुक्यात श्रीदत्त शरद पंचगंगा जवाहर हे सहकारी साखर कारखान्यावर गुरुदत्त संजय घोडावत गूळ खांडसरी हे खाजगी साखर कारखाने आहेत. शिरोळ तालुक्यात 25 हजार हेक्टर अधिक ऊस क्षेत्र आहे. जिल्ह्याचे ठरावीत सहकारी साखर कारखान्यांनी गट गळीत हंगामातील एफआरपी दिली आहे. रित्या पार पीसने मागण्यासाठी विविध शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत ऊसतोड मजूर यांनी ही विविध मागण्या केल्या आहेत.
येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम येथे 18 तारखे पासून होणार आहे. त्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शरद सहकारी साखर कारखाना जवाहर कारखाना यासह अन्य सहकारी साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत.