नाशिकच्या 68 गावांमधील अनुकरणीय उपक्रम
आयएफएस अधिकारी आनंद रेड्डी यांनी एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात जमिनीवर पडलेल्या अनेक गलोल दिसून येतात. झाडावरील फळे पाडण्यासाठी या गलोलचा प्रत्येकानेच वापर केला असेल. पण येथे हे प्रकरण काही वेगळे आहे. एक सुंदर पक्षी दिसतो, त्यानंतर त्या गलोलद्वारे मुलाने पक्ष्याला मारल्यावर तुम्ही त्याला शिक्षा कराल का हा प्रश्न उपस्थित होतो. पण नाशिकच्या गावांमध्ये हे घडत आहे.
आनंद रेड्डी यांनी हे ट्विटर थ्रेड शेअर केले आहे. यात आणखीन काही छायाचित्रेही शेअर करण्यात आली आहेत. यात मुलांनी गलोल जमिनीवर टाकल्याचे दिसून येते. तसेच मुलांच्या हातातील बॅनवर ‘गलोर हटवा, पक्षी वाचवा’ असा संदेश दिसून येतो.
गलोलचा नाद सोडण्यासाठी मुलांशी बोला, त्यांना ते किती धोकादायक आहे हे सांगण्यात यावे. त्यांच्याकडून भविष्यात पक्ष्यांना मारण्यासाठी गलोलचा वापर कधीच करणार नसल्याचा शब्द घ्या असा संदेश रेड्डी यांनी दिला आहे.
मागील 30 दिवसांमध्ये 590 गलोल मुलांनी जमा केले आहेत. 68 गावांमधील मुलांनी गलोल बाळगणार नसल्याची, त्याच्याद्वारे पक्ष्यांना मारणार नसल्याची शपथ घेतली आहे. गलोल पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असतो. पक्ष्यांचे सभोवताली असलेले अस्तित्व सुखावह असते. निसर्गाबद्दलचे आनंद यांचे हे पाऊल लोकांना कौतुकास्पद वाटले आहे.









