कणकवली/प्रतिनिधी-
1991 साली मुंबईत शिवसेना नसती तर आज जे शिवसेनेला तालिबानी म्हणत आहेत.त्याच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने मुंबई वाचवली होती. हिंदू लोकांना वाचविले होते. आजही मुंबईच्या जनतेला माहिती आहे की शिवसेना नसेल तर मात्र मुंबईत हिंदूंचे, मराठी माणसांचे काही खरं नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला तालिबानी संस्कृती म्हटले तरी जनता ही शिवसेनेच्या पाठीशी राहील असे प्रत्युत्तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, खरतर बाळासाहेबांच्या पुढे अनेक लोकांच्या माना झूकल्या अनेक लोक नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, प्रणव मुखर्जी असतील किंवा त्या वेळेची ग्यानी झेलसिंग असतील. देवेंद्र फडणीस यांचा बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी मोठा हातभार आहे हे आम्ही नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस येणार म्हणून स्मारकाच्या ठिकाणी परवानगी दिली. माञ स्मारकाच्या ठिकाणी येऊन सुध्दा नारायण राणेंनी टीका करण्याचे काम केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते आवडले नाही म्हणून त्यांनी गोमूत्र शिंपडले ते बाळासाहेबांचे कार्यकर्ते होते.
बाळासाहेबांचे निधन झाले त्या वेळी देशातील लाखो जनता त्याठिकाणी आली. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले. परंतु नारायण राणेंना त्या वेळी तीथे येण्याची हिम्मत झाली नाही.आज मात्र केंद्रीय मंत्री पदाच्या पदराआड किंवा भाजपच्या पदराआड दर्शन घेतले. पण दर्शन घेताना सुध्दा त्यांना बाळासाहेबांचे विचार कधी समजले नाहीत. अश्याना घेऊन भाजप वाढत असेल तर त्याचा लखलाभ भाजपला व्होवो. माञ शिवसेना आजही ठामपणे उभी आहे आणि उद्याही राहील.
फक्त शिवसेनेनेवर टीका करण्यासाठीच ही जण आशीर्वाद याञा आहे का? या येञेला लोकांचा आशिर्वाद मिळणार नसून लोकांचा आशिर्वाद राणेंनी दहा वर्षां पुर्वीच गमावला आहे. येथील आमदार आणि खासदार शिवसेनेचेच निवडून आलेत त्यामुळे कोकणातील जनतेचा आशिर्वाद राणेंना मिळाला नाही आणि या पुढच्या काळात सुद्धा तो मिळणार नाही. राणे भाजपच्या पदराआड राहून मोदीजींचं नाव सांगून शिवसेनेनेवर आरोप करण्यासाठी फिरत आहेत.









