कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेहून अधिक धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. या अगोदरच्या लाटेमध्ये वयोवृद्ध रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु आता मात्र लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिला यांची संख्या दिसून येत आहे. सामान्यतः गर्भवती महिलांना तीव्र स्वरूपाचा कोविड होण्याची संभावना खूप कमी असते, असे आजपर्यंतच्या अभ्यासात दिसून आले आहे. परंतु ज्या गरोदर महिलांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, अस्थमा, जास्त वजन वगैरे व्याधी पहिल्यापासूनच आहेत अशांना गंभीर स्वरूपाचे कोरोना संक्रमण होऊ शकते व 1.5… रुग्णांना आयसीयूमध्ये ऍडमिट करण्याची गरज पडू शकते. अद्यापही गर्भवती मृत्युदर अत्यल्प म्हणजे 0.2… इतकाच आहे.
लक्षणे-कोरोनाची लागण झालेल्या गरोदर महिलेला ताप, धाप, सर्दी, खोकला, घसा, जुलाब, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास, घशातील स्त्रावाची (आरटीपीसीआर) तपासणी करून कोव्हिडचे निदान केले जाते. एखादी गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आली अथवा लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नये. तात्काळ आपल्या स्त्रीरोग-प्रसूती तज्ञांशी संपर्क साधावा.
गर्भावर होणारे परिणाम- महिला गरोदर असते तेव्हा तिच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे सौम्य, मध्यम व तीव्र स्वरूपाचा कोव्हिड आजार होऊ शकतो. सर्वच पॉझिटिव्ह गर्भवती महिलांना ऍडमिट व्हावे लागत नाही. लक्षणे सौम्य प्रकारची असतील तर 14 दिवस घरीच अलग राहून उपचार घेता येतात. सर्वसामान्य महिलांना जे उपचार दिले जातात ते सर्व उपचार गरोदरपणातही करता येतात. बाळावर या संसर्गाचा जास्त काही परिणाम होत नाही. नाळेद्वारे, प्रसव मार्गातून अथवा स्तनपानातून, बाळास कोरोना संसर्ग होत नाही असे आढळून आले आहे. त्यामुळे गर्भपात करावा लागत नाही. आजवर असे आढळले आहे की गर्भारपणात मध्यम प्रकारचा व बरा होणारा न्यूमोनिया होतो. तसेच लवकर प्रसूती होणे, गर्भपात होणे, गर्भ खराब होणे, मृत बाळ, कमी वजन, रक्तदाब वाढणे अशा काही गोष्टी खूप अल्पप्रमाणात दिसून आल्या आहेत. कोविड संक्रमित गर्भवती महिलेची डिलिव्हरी सामान्य प्रकारे केली जाते, विनाकारण गर्भपात करावा लागत नाही. केवळ गंभीर संक्रमण झाले व गुंतागुंत झाली तर परिस्थितीचा विचार करून लवकर शस्त्रक्रिया करून डिलिव्हरी अथवा गर्भपात करावा लागतो. कोरोनामुळे प्रसूती प्रक्रियेत अथवा डिलीवरी करण्याच्या मार्गपद्धतीमध्ये कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे घाबरून न जाता आपले मनस्वास्थ्य योग्य राखून कोरोनाशी सामना करावा.
घरी उपचार- शरीरात कोरोना विषाणूंचा संसर्ग एकूण चौदा दिवसांचा असतो त्यानंतर तो स्वतःच नाहीसा होतो. गर्भवती महिलेची कोरोना ट्रीटमेंट संक्रमणाच्या तीव्रतेनुसार केली जाते. सौम्य प्रकारची लक्षणे असणाऱया रुग्णास ऍडमिट न करता घरी राहूनच औषधोपचार केले जातात. प्राथमिक तपासण्यासुद्धा सर्वसामान्यांप्रमाणेच केल्या जातात. गर्भारपणातील सौम्य प्रकारच्या कोव्हिड आजारासाठी घरी 14 दिवस अलग राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. 1) घाबरून जाऊ नका. 2) डॉक्टरांशी फोनवर संपर्कात राहा. 3) 14 दिवस वेगळय़ा खोलीत राहा. 4) खोलीतील हवा खेळती ठेवा. खिडक्मया उघडय़ा ठेवा. 5) दर 6 तासांनी ताप व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासा. 6) ऑक्सिजनचे प्रमाण 95ज्ञ् पेक्षा वर असले पाहिजे. 7) प्रोटीनयुक्त पौष्टिक आहार घ्यावा 8) सुरक्षित अंतर, मास्क, वारंवार साबणाने हात धुणे गरजेचे. 8) आपल्या खोलीत हालचाल, फिरणे ठेवा. 9) नाक, डोळे, तोंडाला स्पर्श करणे टाळा. 10) शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करा. 11) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताप, टॉनिक, इतर औषधे नियमित सुरू ठेवा.
हॉस्पिटलमध्ये कधी दाखल व्हावे?
मध्यम अथवा तीव्र स्वरूपाच्या कोरोना संसर्ग गर्भवतीला तसेच कोमॉर्बिड गर्भवतीला जर 1) वारंवार 100 फॅ.पेक्षा जास्त प्रमाणात ताप येत असल्यास. 2) श्वास घेण्यास त्रास होत असल्यास. 3) चालताना, बोलताना खोकला व धाप लागत असल्यास. 4) 6 मिनिटे चालल्यानंतर मशीनद्वारे ऑक्सिजन 3 अंकाने कमी होत असल्यास, अथवा ऑक्सिजन 95पेक्षा कमी दाखवत असल्यास. 5) ओठ निळे पडत असल्यास. 6) प्रचंड थकवा जाणवल्यास, आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे. सर्वसामान्य इतर रुग्णांप्रमाणेच कोरोनासाठीच्या रक्ताच्या तपासण्या, छातीचा सिटीस्कॅन, बाळाची सोनोग्राफी इत्यादि तपासण्या केल्या जातात. हृदयाची गती, श्वसनाचा वेग, ब्लड प्रेशर, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, बाळाचे ठोके यावर नियमित लक्ष ठेवले जाते.
हॉस्पिटलमध्ये औषधोपचार-ऑक्सिजन, सलाईन, अँटिबायोटिक, अँटीव्हायरल, लो डोस अस्पिरिन, अँटीपायरेटिक, रक्त पातळ करणारी इंजेक्शन, औषधे, गरज वाटल्यास स्ट्रीरॉइड, मनोधैर्य वाढवणे असे उपचार करावे लागतात. रुग्णास बरे वाटल्यास दोन आठवडय़ांनी घरी जाण्यास परवानगी दिली जाते. पुढे 2 आठवडय़ानंतर बाळाची वाढ पाहण्यासाठी सोनोग्राफी करावी लागते.
गंभीर प्रकारच्या पॉझिटिव गर्भवती महिलांनी कधी आयसीयू हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे? जर 1) श्वसन वेग 22 ते 25 प्रति मिनिटपेक्षा जास्त. 2) ऑक्सिजन सॅच्युरेशन 90 पेक्षा कमी. 3) फुफ्फुसातील निमोनिया संसर्ग 50ज्ञ्पेक्षा जास्त असल्यास. 4) रक्तदाब अति कमी वा अती जास्त असल्यास. 5) बेशुद्धावस्था येत असल्यास. 6) सेफ्टीक शॉक, अक्मयुट ऑर्गन फेल्युअर अशा परिस्थितीत रुग्णास तात्काळ आयसीयूमध्ये ऍडमिट करावे लागते. परिस्थितीचा आढावा घेऊन गर्भपात अथवा डिलिव्हरी करण्याचा निर्णय चिकित्सक घेत असतात. अतिदक्षता विभागात ऍडमिट गर्भवती महिलेस ऑक्सिजन, शिरेवाटे न्यूट्रिशन, ऑक्सिजन, शिरेवाटे अँटिबायोटिक्स, अझिथ्रोमाइसिन, शिरेवाटे रेमडेसेवीर, ओसेलटामविर, रिटोनाविर, स्टिरॉइड्स, लो डोस अस्पिरिन, लोमॉलेक्मयुलर वेट हिपारीन, विटामिन्स अशा उपायोजना गरोदरपणामध्ये वैद्यकीय तज्ञ सांगतात.
डिलिव्हरी – सर्व सोयींनीयुक्त इस्पितळात सर्व प्रकारची कोरोना संरक्षण पीपीई किट घालून, काळजी घेवून, बाळाची पूर्ण वाढ झाली असल्यास डिलिव्हरी केली जाते. प्रसूती प्रक्रियेत सामान्य स्त्रीप्रमाणेच पण कमी वेळेत डिलिव्हरी करावी लागते. जास्त माणसांचा संपर्क येऊ दिला जात नाही, परिस्थितीनुसार स्त्रीरोग प्रसूती तज्ञ नॉर्मल डिलीवरी अथवा सिजेरियन याचा निर्णय घेतात. यावेळी स्पायनल अथवा एपिडय़ूरल भूल जास्त सोयीस्कर असते. या प्रसूतीमध्ये बाळाची नाळ लवकर कापली जाते. प्रसूतीनंतर लगेच माता हात स्वच्छ करून, फेसमास्क लावून बाळाला स्तनपान करू शकते व जवळ घेऊ शकते. मातेचा कोव्हिड संसर्ग 14 दिवसांच्या आतील असेल तर बाळाला काही दिवस बाजूला ठेवावे लागते. बालकास संसर्ग झाला आहे का हे पाहण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. परंतु गर्भारपणात बाळाला कोरोना संसर्ग होतो याचा कोणताही पुरावा नाही. सध्या गरोदर स्त्रियांना व अंगावर पाजणाऱया महिलांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. यासोबत स्वतःची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे, त्रिसूत्री पाळणे, आरोग्यदायी आहार घेणे, सुरक्षित अंतर राखणे, 8 तास झोप घेणे, मन आनंदी ठेवणे, गर्दीच्या वेळी दवाखान्यात जाणे टाळणे. घरामध्येच राहणे, कोरोना लस टोचून घेणे अशा सर्व गोष्टी कोरोना प्रतिबंध करण्यास मदत करतात व स्वस्थ गर्भधारणेची शक्मयता वाढते.
डॉ.संजय पंतबाळेकुंद्री








