नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
कोरोनाचा अधिक संक्रमित होऊ शकणारा डेल्टा हा उपप्रकार ‘प्रबळ कुळ’ (डॉमिनंट लायनेज) ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. अशा स्थितीमध्ये गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत आयसीएमआरचे (ICMR ) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भवती महिलांना कोरोना लस दिली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी आज दिली आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भवती महिलांना करोना लस दिली जाऊ शकते. गर्भवती महिलांसाठी लसीकरण उपयुक्त आहे आणि ते केले जावे.
मुलांना लस देण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, अमेरिका हा एकमेव देश आहे. जो यावेळी मुलांना लस देत आहे. अगदी लहान मुलांना या लसची गरज भासणार का हा एक प्रश्न आहे. जोपर्यंत आमच्याकडे बाल लसीकरणाबद्दल अधिक डेटा नसेल तोपर्यंत लस मोठ्या प्रमाणात मुलांना देण्याच्या स्थितीत आपण नसू, असे देखील ते म्हणाले.
डेल्टा प्लस सध्या १२ देशांमध्ये आहे. भारतात ४५००० नमुन्यांपैकी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५० प्रकरणे नोंदविली गेली असून त्यापैकी सर्वाधित २० महाराष्ट्रातील आहेत. आम्ही हे विषाणू वेगवेगळे केले आहेत. तसेच अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टासाठी ज्याप्रकारे परिक्षण केले. त्याप्रमाणेच डेल्टा प्लसवरही तीच चाचणी करत आहोत. ७ ते १० दिवसांत त्याचा निकाल मिळेल, अशी आमची अपेक्षा असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यावेळी म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









