प्रतिनिधी/ बेळगाव
गर्भलिंग निदानाविरोधी कायदा आणि नियम याबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगाव विभागीय स्तरावर कार्यशाळा झाली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या सहसंचालिका डॉ. पुष्पा अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीपीएनडीटी बेंगळूरचे डॉ. विवेक दोराई, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी, सिव्हिल हॉस्पिटलचे रेडीओलॉजिस्ट डॉ. ईरण्णा पल्लेद, जिल्हा सल्ला समिती सदस्या अॅड. शिल्पा गोदीगौडर उपस्थित होते.
प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. पुष्पा यांनी लिंग निदान विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. डॉ. कोणी यांनी सदर कायद्याबाबत जिल्ह्यात हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.









