मुंबई \ ऑनलाईन टीम
खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा समाजाच्या आरक्षण मुद्दयावरून सगळ्या पक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीमध्ये मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी चर्चा करण्यात आली. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे हे राज ठाकरेंचे मत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सांगितले.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कामाची पद्धत वेगळी आहे. ते खऱ्या अर्थाने जात पात काही मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे ते आहेत. तसेच माझी जी भूमिका आहे त्याला राज ठाकरे पाठिंबा देत आहेत.
दुसऱ्या विषयावर चर्चा झाली ती म्हणजे किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे, महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन कसे करता येईल यादृष्टिकोनातून चर्चा झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार आहे. तर दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








