वृत्तसंस्था/ पॅरीस
कोरोना महामारी संकटामुळे अनेक खेळाडूंची आर्थिक स्थिती कोलमडली असून अशा गरजू टेनिसपटूंना आर्थिक मदत देण्यासाठी आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या नियंत्रण समितीने तसेच चार ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा आयोजकांनी 60 लाख डॉलर्सचा निधी उभा केला आहे.
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील विविध स्पर्धा कोरोना महामारीमुळे स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्याने टेनिसपटूंची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. या टेनिसपटूंच्या आर्थिक कमाईवर विपरित परिणाम झाला आहे. एकेरी आणि दुहेरीतील सुमारे 800 टेनिसपटूंना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, अशा टेनिसपटूंना 60 लाख डॉलर्सची मदत करण्यात येणार असल्याचे आयटीएफच्या प्रवक्त्याने सांगितले.









