प्रतिनिधी/ संकेश्वर
नेर्ली (ता. हुक्केरी) येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन व निलेश जाधव यांनी आपल्या स्वखर्चातून गरीब व गरजू 60 कुटुंबाना गॅस व शगडीचे वाटप करून एक आदर्श निर्मान केला आहे. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून कौतुक करण्यात येत आहे.
शासनाच्या विविध योजनेतर्गंत सर्वांना वस्तू मिळत नाहीत. पण, या जाधव बंधूनी आपल्या स्वखर्चातून या महिलांना गॅस व शेगडीचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सरकारकडून ग्रामपंचायतीला निधी देण्यात येतो. तो वेळेत मिळत नसल्याने या जाधव बंधूंनी स्वत: गटारी व गावात औषध फवारणी करून गाव निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्वखर्चातून गावात बल्ब लावण्याचे कार्य त्यांनी केले आहे.









