केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी स्पोर्ट्स अकादमी गदगने सीसीके धारवाड ब संघाचा 138 धावानी, आनंद अकादमीने इंडियन बॉईज संघाचा 221 धावांनी, हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स हुबळी संघाचा 9 गडय़ांनी व टॅलेंट क्लब हुबळी संघाने विजया क्रिकेट अकादमी संघाचा 4 धावांनी पराभव केला. आकाश हिरेमठ (टॅलेंट), पुनीत बासवा हुबळी, राहुल नाईक, सचिन शिंदे, निखील आकाश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 45 षटकात सर्वबाद 222 धावा केल्या. त्यात आकाश हिरेमठने 10 चौकारासह 83, श्रवण टी.ने 28, भार्गव नाडगेरने 29, संजय एस. एम. ने 22, किरणकुमार साखरीने 16 धावा केल्या. विजया अकादमीतर्फे सिद्धार्थ गोदवानीने 48 धावात 4, ओम वेर्णेकरने 14 धावात 3 तर यश हावळाण्णाचे व निलेश पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजया क्रिकेट अकादमीचा डाव 47.4 षटकात 218 धावात आटोपला. त्यात मनोज सुतारने 70, शिवम गावडाने 45, ओम वेर्णेकरने 19, सिद्धार्थ गोदवानीने 17, रोहन बेकवाडकरने 16, मयांकराजने 16 धावा केल्या. टॅलेंट हुबळीतर्फे आकाश हिरेमठने 42 धावात 3, अझर नदाफने 15 धावात 2 तर भार्गव नाडगेर, श्रवण गौडा बिरादार, शरण टी., किरणकुमार साक्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केएससीए बेळगाव मैदानावरील सामन्यात आनंद अकादमीने 50 षटकात 3 बाद 349 धावा केल्या. राहुल शिंदेने 11 षटकार, 9 चौकारासह नाबाद 131, राहुल नाईकने 1 षटकार, 12 चौकारासह नाबाद 101 धावा करून दोघांनीही शतक झळकविले. किसन मेघराजने 56, केतज कोल्हापुरेने 28, नागेंद्र पाटीलने 17 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे केदार खटावकर, इस्माईल सय्यद, आरिफ बाळेकुंद्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज संघाचा डाव 38.1 षटकात 128 धावात आटोपला. गौस हाजीने 48, अंजुम मोरबने 23, लतीफ संनदीने 11 धावा केल्या. आनंदतर्फे सचिन शिंदेने 21 धावात 3, संमेद बेल्लदने 22 धावात 3, ओंकार देशपांडेने 31 धावात 2 तर केतज कोल्हापुरेने 1 गडी बाद केला.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 34.1 षटकात सर्व बाद 131 धावा केल्या. त्यात अभिषेक बेलकाईने 39, अभिषेक देशपांडेने 37, विष्णू राजापूरकरने 21, यल्लाप्पा काळेने 13 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे वृषभ पाटीलने 24 धावात 3, मनिष एम. एस. ने 34 धावात 3, मनिकांत बुकीटगारने 14 धावात 2 तर सुजल पाटील व पुनीत बासवा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने 29 षटकात 1 गडी बाद 135 धावा करून सामना 9 गडय़ानी जिंकला. पुनीत बासवाने नाबाद 55, आकाश कट्टीमणीने नाबाद 52, हर्ष जाधवने 14 धावा केल्या. हुबळीतर्फे यल्लाप्पा काळेने 1 गडी बाद केला.
आरसीआय हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्ट्स अकादमी गदग संघाने 50 षटकात सर्वबाद 362 धावा केल्या. निखील आकाशने 80, शुभम जैनने 70, शिवराज करडीने 59, किरण ए.ने 53, समीर एम. जी.ने 47, सचिन पाटीलने 17 धावा केल्या. सीसीके धारवाडतर्फे श्रेयस मुर्डेश्वर, शामसुंदर डी. यांनी प्रत्येकी 2, संतोष लमाणी, अक्षय कुलकर्णी, यशीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीके धारवाड संघाचा डाव 41.4 षटकात 230 धावात आटोपला. शामसुंदर डी.ने 64, शिवनगौडा पाटीलने 37, श्रेयस मुर्डेश्वरने 43 धावा केल्या. गदगतर्फे शांतगौडा पाटीलने 45 धावात 3, समिर एम. जी.ने 2 तर सचिन पाटील, कार्तिक व सुभाष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









