प्रतिनिधी / कोल्हापूर
गणेश विसर्जन मिरवणूकीस जिल्हा प्रशासनाने मनाई घातलेली असता, म्हालसवडे ( ता. करवीर ) गावामधील एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्याने साऊंड सिस्टीम लावून चार चाकी वाहनातून मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. जयहिंद तरुण मंडळ असे त्या मंडळाचे नाव असून या मंडळाच्या अध्यक्षासह पंधरा जणाचा समावेश आहे.
पोलिसांनी किरण मधुकर पाटील, सचिन राजाराम पाटील, निलेश विलास कुंभार, विजय मधुकर निकम, शिवाजी गणपती निकम, उमेश विष्णु पाटील, संदीप सुभाष पाटील, सागर मारुती पाटील, सचिन शंकर पाटील, गौरव गोविंद पाटील, गोविंद वसंत पाटील, गणेश हिंदुराव पाटील, शुभम संभाजी पाटील, समीर तुकाराम पाटील, अनिकेत बळवंत पाटील ( सर्व रा.म्हालसवडे, ता करवीर, जि. कोल्हापूर ) यांच्याविरोधी गुन्हा नोंद केला आहे.
गणेश मुर्तींचे मिरवणुकीने विसर्जन करु नका विसर्जन मिरवणुकीस जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मनाई घातली आहे. तरी देखील जयहिंद तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनाई आदेश धाब्यावर बसवून मंडळाच्या श्रीं च्या मुर्तीचे सोमवारी रात्री चार चाकी वाहनातून मोठा साऊंड सिस्टीम लावून विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना श्रीं च्या विसर्जन मिरवणूकीस बंदी असून, मिरवणूक काढू नका असे सांगितले. तरी देखील याकडे साफ दुर्लक्ष करुन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जोर जोरात साऊंड सिस्टीम लावून, सार्वजनीक शांतता भंग केला. कोरोना संसर्गाचे अनुशंगाणे जिल्हा प्रशासनाने जिल्हयामध्ये घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग करीत, कोरोना आजाराचा संसर्ग होईल असे जाणीव पुर्वक कृत्य केलेल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी भादवि कलम 188,143 , 269 . 270,290 , राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 चे कलम 51 ( ब ) कोवीड -19 उपाय योजना नियम 2020 कलम 11 साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम 2,3.4 , सह बिपी अँक्ट 135 तसेच बिपी अॅक्ट 33 W चा भंग चे कलम 131 ( N ) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









